Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन प्रतिनिधी : जुबेर शेख मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026" जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. राज्यातील शेतकरी वारंवार नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यांसारख्या संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडत असल्याने त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 आणि महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 राबविण्यात आली होती. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्जे या योजनेस पात्र ठरणार आहेत. अशा शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह एकत्रित थकबाकीच्या रकमेपैकी कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. तसेच कमी रकमेचे कर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही किमान 5 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष फेडलेल्या रकमेइतका लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर "एकवेळ समझोता योजना" (OTS) अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. माजी व विद्यमान मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, 25 हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन घेणारे सरकारी अधिकारी-कर्मचारी, आयकर भरणारे व्यक्ती, 25 हजार रुपयांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेणारे नागरिक तसेच काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी या योजनेस अपात्र असतील. योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक असेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून शेती क्षेत्राला आर्थिक बळकटी देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत असून, कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाही राबविण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना2026 #कर्जमाफी #महाराष्ट्रशासन #शेतकरीहित #कृषीबातम्या #महाराष्ट्रन्यूज #FarmerLoanWaiver #AgricultureNews #MaharashtraGovernment #FarmerRelief #KisanSamman #RuralDevelopment #VeerMaharashtraNews #वीरमहाराष्ट्रन्यूज #BreakingNews #MarathwadaNews #MaharashtraPolitics #FarmersFirst

Tuljapur, Dharavshiv | Jun 2, 2026

MORE NEWS

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद 

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 13, 2026

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 12, 2026

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

Tuljapur, Dharavshiv | Jun 8, 2026

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या.

दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता.

ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली.

या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

"प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे.

#तुळजापूर
#तीर्थबुद्रुक
#जिल्हाधिकारीदौरा
#कीर्तीकुमारपुजार
#धाराशिव
#ग्रामीणविकास
#प्रशासनगावाच्यादारी
#स्वच्छतामोहीम
#एकपेडमाँकेनाम
#वृक्षारोपण
#ग्रामविकास
#लोकसहभाग
#शासकीययोजना
#शिवारफेरी
#MaharashtraNews
#Tuljapur
#Dharashiv
#RuralDevelopment
#VeerMaharashtraNews
#NextFrameNews

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या. दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता. ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली. या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. "प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे. #तुळजापूर #तीर्थबुद्रुक #जिल्हाधिकारीदौरा #कीर्तीकुमारपुजार #धाराशिव #ग्रामीणविकास #प्रशासनगावाच्यादारी #स्वच्छतामोहीम #एकपेडमाँकेनाम #वृक्षारोपण #ग्रामविकास #लोकसहभाग #शासकीययोजना #शिवारफेरी #MaharashtraNews #Tuljapur #Dharashiv #RuralDevelopment #VeerMaharashtraNews #NextFrameNews

Tuljapur, Dharavshiv | Jun 6, 2026

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळ...

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार? प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळ...

Tuljapur, Dharavshiv | Jun 1, 2026