Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

पत्रकार अनिल आगलावे यांना राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार प्रदान प्रदीर्घकाळच्या निस्वार्थ समाजसेवेचा गौरव; सामाजिक कार्य व लोकाभिमुख पत्रकारितेची राज्यस्तरावर दखल प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर – धाराशिव जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल आगलावे यांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य (रायगड) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा "डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न राज्यस्तरीय पुरस्कार" प्रदान करून गौरविण्यात आले. पनवेल येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, स्वागताध्यक्ष तथा माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल नाचपल्ले, महिला राज्याध्यक्ष रेखा सुडे, राज्य सरचिटणीस संतोष भोजने, महिला राज्य सरचिटणीस विनया जाधव, राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, धाराशिव जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय, हक्क व संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी पत्रकारिता आणि समाजकारण या दोन्ही माध्यमांतून अनिल आगलावे यांनी प्रदीर्घ काळ निस्वार्थपणे कार्य केले आहे. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविणे तसेच गरजू घटकांना मदतीचा हात देणे या त्यांच्या कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील रहिवासी असलेले अनिल आगलावे हे पुजारी नगर फाउंडेशनचे संस्थापक सदस्य असून संस्कार भारती धाराशिव जिल्हा कार्यकारिणी सदस्य, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच आमदार संवाद मंचचे मुख्य समन्वयक म्हणून विविध क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत आहेत. जात, धर्म, पंथ आणि पक्षीय भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने योगदान देत आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दैनिक सामना, पुणे येथे उपसंपादक म्हणून कार्य केल्यानंतर ते सध्या तरुण भारत, सोलापूर या दैनिकाचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील मूलभूत समस्या, शेतकरी प्रश्न, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न यांना त्यांनी आपल्या लेखणीद्वारे सातत्याने वाचा फोडली आहे. समाजकारणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांमध्ये तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे राबविण्यात आलेल्या जलसंधारण मोहिमेचा विशेष उल्लेख केला जातो. आमदार संवाद मंचच्या माध्यमातून गावात सुमारे चार हजार सीसीटी बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. लोकसहभागातून साकारलेल्या या उपक्रमामुळे भूजल पातळीत वाढ होऊन गावाच्या जलसमृद्धीत मोलाचे योगदान मिळाले आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीत जनजागृती, समन्वय आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी आगलावे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शासन, प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांना गती मिळवून दिली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मिळालेला राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून त्यांनी ज्या वंचित, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी सातत्याने कार्य केले त्या सर्व समाजघटकांच्या योगदानाचाही गौरव असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणारे भारतरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातील युवा पत्रकाराला मिळाल्याने जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारिता आणि लोकहितासाठी समर्पित समाजकार्य यांचा संगम असलेल्या अनिल आगलावे यांच्या कार्याला मिळालेली ही राज्यस्तरीय पावती म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात आहे. #dharashiv #tuljapur #LatestNews #MaharashtraNews #veermaharashtranews #वीरमहाराष्ट्रन्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 5, 2026

MORE NEWS

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद 

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

FDA आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 13, 2026

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय

#BreakingNews
#FDA
#TukaramMundhe
#IASOfficer
#GutkhaBan
#GutkhaMafia
#MCOCA
#TobaccoFreeMaharashtra
#MaharashtraNews
#LawAndOrder
#AntiTobaccoDrive
#FoodAndDrugsAdministration
#StateNews
#VeerMaharashtraNews
#धाराशिव
#महाराष्ट्र_बातम्या
#गुटखा_बंदी
#तुकाराम_मुंढे
#मकोका
#ब्रेकिंग_न्यूज

गुटखा माफियांचे धाबे दणाणले;गुटखा माफियांवर आता मकोकाचा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय #BreakingNews #FDA #TukaramMundhe #IASOfficer #GutkhaBan #GutkhaMafia #MCOCA #TobaccoFreeMaharashtra #MaharashtraNews #LawAndOrder #AntiTobaccoDrive #FoodAndDrugsAdministration #StateNews #VeerMaharashtraNews #धाराशिव #महाराष्ट्र_बातम्या #गुटखा_बंदी #तुकाराम_मुंढे #मकोका #ब्रेकिंग_न्यूज

Tuljapur, Dharavshiv | Jun 12, 2026

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

सोलापूर - पुणे हायवेवर मुसळधार पावसाला सुरुवात #pune #punecity #pause #NH #tuljapur #वीरमहाराष्ट्रन्यूज #जिद्दआणिचिकाटी #veermaharashtranews #reallife

Tuljapur, Dharavshiv | Jun 8, 2026

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या.

दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता.

ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली.

या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

"प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे.

#तुळजापूर
#तीर्थबुद्रुक
#जिल्हाधिकारीदौरा
#कीर्तीकुमारपुजार
#धाराशिव
#ग्रामीणविकास
#प्रशासनगावाच्यादारी
#स्वच्छतामोहीम
#एकपेडमाँकेनाम
#वृक्षारोपण
#ग्रामविकास
#लोकसहभाग
#शासकीययोजना
#शिवारफेरी
#MaharashtraNews
#Tuljapur
#Dharashiv
#RuralDevelopment
#VeerMaharashtraNews
#NextFrameNews

तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; तीर्थ बुद्रुकमध्ये विकासाचा थेट संवाद, स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर – प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासविषयक गरजा जाणून घेतल्या. दि. ५ जून रोजी सायंकाळी तीर्थ बुद्रुक येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात मुक्काम केला. त्यांच्या सोबत तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचा उद्देश केवळ शासकीय कामकाजाची पाहणी नसून, गावाच्या विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून ठोस दिशा निश्चित करणे हा होता. ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, मूलभूत सुविधांची उपलब्धता, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शेतीसंबंधी प्रश्न तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली. या बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून विकास नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या उपस्थितीत गावात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिवार फेरी काढून शेती क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा गावकऱ्यांसाठी विशेष ठरला. प्रशासन थेट गावाच्या दारात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून गावाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. "प्रशासन गावाच्या दारी" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा दौरा तीर्थ बुद्रुकच्या विकासासाठी नवी दिशा देणारा ठरल्याची चर्चा गावात होत आहे. #तुळजापूर #तीर्थबुद्रुक #जिल्हाधिकारीदौरा #कीर्तीकुमारपुजार #धाराशिव #ग्रामीणविकास #प्रशासनगावाच्यादारी #स्वच्छतामोहीम #एकपेडमाँकेनाम #वृक्षारोपण #ग्रामविकास #लोकसहभाग #शासकीययोजना #शिवारफेरी #MaharashtraNews #Tuljapur #Dharashiv #RuralDevelopment #VeerMaharashtraNews #NextFrameNews

Tuljapur, Dharavshiv | Jun 6, 2026

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर : तुळ...

तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार? प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळ...

Tuljapur, Dharavshiv | Jun 1, 2026