दिग्रस: शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भाजपची बैठक संपन्न, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बाबत झाली चर्चा
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्रस येथील भारतीय जनता पक्षच्या नवीन व जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज दि.२० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान दिग्रसच्या शासकीय विश्रामगृहात पार पडली. यात आगामी निवडणुकीत पक्षाची रणनीती ठरविणे, स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि पदाधिकऱ्यांचे मते जाणून घेणे, तसेच इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडत संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी सुचना मांडल्या. तसेच स्थानिक पातळीवर विचारविनिमय झाला.