नागपूर शहर: आनंदनगर येथून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, चोरी गेलेली दुचाकी जप्त
27 सप्टेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतील आनंदनगर येथे राहणारे श्रेयश घाडगे यांनी त्यांची दुचाकी घरासमोरून चोरी गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून आशीर्वाद नगर येथून आरोपीला अटक केली. अटकेतील आरोपीचे नाव मोहीलाल मध्ये राहणार मध्य प्रदेश असे सांगण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे