परभणी: आंदोलन मैदानाची मोठी दुरावस्था न्याय हक्कासाठी बसावे कुठे स्वराज इंडिया जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी यांचे उपोषण
जिल्हाधिकारी कार्यालया समोरील मोकळी जागा आंदोलनकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र मैदानाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून सर्वत्र पाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य झाल्याने येथे आंदोलन उपोषण करणे अशक्य झाले आहे. आंदोलन मैदानाची तात्काळ दुरुस्ती करून मूलभूत सुविधा द्याव्या तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा आंदोलन मैदानात उभारण्यात यावा या मागणीसाठी स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी यांनी आज बुधवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपोषण.