गोंदिया जिल्ह्यातील दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीची निवडणुकीची मतदान प्रक्रिया काल दिनांक २ डिसेंबर रोजी पार पडल्यानंतर आता ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत गोंदिया शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजच्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे तीन लेयर मध्ये हा बंदोबस्त लावण्यात आला असून स्ट्रॉंग रूमच्या आतील भागांमध्ये 37 एसआरपीएफ जवान तर बाहेर जिल्हा पोलिसांचे 35 अधिकारी कर्मचारी सुरक्षा देत आहेत तीन डिसेंबरला होणारी मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार