वेकोलीच्या बल्लारपूर व वणी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा व कोरपना तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांच्या समस्या संदर्भात आज दि.२५ ऑक्टोबर ला ३.३० वाजता वेकोलि अधिकाऱ्यांसोबत आ देवराव भोंगळे यांनी आढावा बैठक घेण्यात आली.वेकोलिच्या बल्लारपूर व वणी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा व कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणीमुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून अशा या विविध समस्यावर चर्चा करण्यात आली.