सेनगाव: आडोळ येथे दोन दिवसीय जंगी शंकरपाटाचे होणार आयोजन, मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बैलजोड्यांना मिळणार बक्षीस
सेनगांव तालुक्यातील आडोळ या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन दिवशीय जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात येणार असून उत्साही नागरिकांनी मोठ्या संख्येने या शंकरपाटामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक 13 व 14 नोव्हेंबर रोजी आडोळ या ठिकाणी महारुद्र महाराज यांच्या कृपेने शंकर पाटाचे आयोजन करण्यात येणार असून शंकरपटाचे उद्घाटन सेनगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या हस्ते होणार आहे.