वर्धा: सावली येथे शेतातील बंड्याला लागली आग : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Wardha, Wardha | Oct 31, 2025 सावली येथे संजय भाऊराव गुळघाने यांच्या शेतातील बंड्याला दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारास 9 वाजता अचानक आग लागली. या आगीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीत सुमारे 70 पाईप, एक गाडी चणा कुटार, रेन पाईप तसेच शेतीसाठी लागणारा संपूर्ण विसरा जळून खाक झाला. या घटनेमुळे गुळघाने कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले असून, त्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.