जालना: संजय नगरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि सांडपाण्याच्या समस्यांवर नागरिक आक्रमक; प्रशासनाला संयुक्त निवेदन
Jalna, Jalna | May 23, 2026 जालना शहरातील जुना जालना परिसरातील संजय नगर, वॉर्ड क्रमांक ११ आणि १३ मधील नागरिकांनी परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग, अतिक्रमण, सांडपाणी आणि स्वच्छतेच्या गंभीर समस्यांविरोधात महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे संयुक्त निवेदन सादर केले आहे. नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत गल्ल्यांमध्ये चारचाकी वाहने, लोडिंग गाड्या आणि ऑटोरिक्षा बेशिस्तपणे उभ्या केल्या जात असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आह