जळगाव जामोद: सुनगाव येथे मनोभावाने पूजा करणाऱ्या भाविकांनी आदिशक्ती दुर्गा मातेला दिला निरोप
आज दिनांक पाच ऑक्टोंबररोजी सुनगाव येथे मनोभावाने पूजा करणाऱ्या भावी भक्तांनी आदिशक्ती दुर्गा मातेला निरोप दिला. सुनगाव येथे सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळांनी संध्याकाळी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून दुर्गा मातेच्या आरत्या गाऊन दुर्गा मातेला अखेरचा निरोप दिला यावेळी पोलीस विभागाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.