जळगाव शहरातील तांबापुरा भागातील मच्छीमार्केट परिसरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवणूक करणाऱ्या एका संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता तांबापूरातून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १९ हजार ३२० रुपये किमतीचा ३ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त केला असून संशयित आरोपीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.