श्रीवर्धन: मंत्रालयात मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा
जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ व २०२५-२६ अंतर्गत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. पाणीपुरवठा, मत्स्य व्यवसाय, खारभूमी, पूर संरक्षण, पतन अभियंता यासंबंधीत कामांची सद्यस्थिती व पुढील वाटचालीबाबत आज मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालय दालनात आढावा बैठक घेतली.