छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे राज्य शासनातर्फे युवक युवतींकरीता दि. 19 जानेवारी ते 3 एप्रिल या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 66 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्यांची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे.असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी दिनांक 2 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास कळविले आहे.