जालना: विविध कामांच्या बिलांवर आयुक्तांच्या सह्या रखडल्याने ठेकेदार नाराज
Jalna, Jalna | May 14, 2026 जालना शहरातील विविध विकासकामांच्या बिलांवर महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. अंजली शर्मा या सह्या करत नसल्याचा आरोप करत ठेकेदारांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रखडलेल्या बिलांमुळे अनेक ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे बोलले जात आहे. महानगरपालिकेकडून वेळेवर देयके न मिळाल्याने यापूर्वीही गंभीर घटना घडल्याचा उल्लेख नागरिकांकडून करण्यात येत आहे. बिलांच्या ताणातून ठेकेदार एम. पी. पवार यांनी घाणेवाडी तलावात आत्महत्या केल्याची घटना घडली होती, तर महेश भालेराव यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न