दर्यापूर: छ.शिवाजी महाराज चौकातील ज्वेलर्स दुकानात बुरखा परिधान केलेल्या महिलेची हातचालाकी;दागिने पळविले
दर्यापूर येथील बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या सचिन हिरुळकर ज्वेलर्स मधून आज दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान एक महिला ग्राहक बुरखा वस्त्र परिधान करून दागिने खरेदी करण्याच्या बहान्याने आली असून तिने हातचालाकी करून सचिन हिरुळकर यांच्या ज्वेलरी मधून सोन्याचे दागिने लंपास केले असल्याची घटना घडली.सदर महिलेने यापूर्वी सुद्धा दर्यापूर मधील एका दुकानात हातचलाकी करून दागिने पळविण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.