अमरावती: सकल धनगर समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; दीपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा, तात्काळ एस.टी.आरक्षणाची मागण
धनगर समाजाला घटनात्मक एस.टी. आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज अमरावती जिल्ह्यातील सकल धनगर समाज मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जोरदार घोषणा देत करण्यात आलेल्या या आंदोलनात जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यात आला. सन २०१४ मध्ये बारामती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एस.टी. आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आरक्षण लागू करू, असेही जाहीर करण्यात आले होते. मात्र, शे