जालना: जुना जालना भागात हातभट्टीवर पोलिसांचा धडक कारवाई; 2 लाख 31 हजाराचे साहित्य नष्ट
Jalna, Jalna | Apr 13, 2026 जुना जालना परिसरातील कैकाडी मोहल्ला येथे गावठी हातभट्टी चालवून दारू विक्री करणार्या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली असून सुमारे 2 लाख 31 हजार रुपयांचे साहित्य नष्ट करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती सोमवार दि. 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली. जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी पथकासह केली.