खालापूर: खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रसाद वाडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
आज बुधवारी दुपारी २ च्या सुमारास वरळी येथे खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रसाद वाडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना प्राधान्य देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच, मुख्य नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.