बीड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांनी 2 हजार 954 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या डॉ. ज्योती घोमरे आणि तुतारी चिन्हावर लढणाऱ्या स्मिता वाघमारे यांचा दारुण पराभव झाला आहे.दरम्यान, रविवार दि.21डिसेंबर रोजी बीड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.