राष्ट्रीय महामार्ग 752 जी अर्थात सावळीविहीर - कोपरगाव उर्वरित कामासंदर्भात आज २ जानेवारी २०२५ सकाळी १० वा. आ.आशुतोष काळे यांनी अधिकारी व ठेकेदार यांची बैठक घेऊन सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या.राष्ट्रीय महामार्ग 752 जीचे पुणतांबा फाटा व बेट नाका येथे बाकी असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा तसेच सर्व्हिस रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना यावेळी उपस्थित अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधी यांना दिल्या.