प्रकल्पग्रस्त समाजाने संघटित होऊन कार्य करा संजय धनाडे राज्यात प्रकल्पग्रस्तांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत असून देशात महाराष्ट्र राज्य हे विकसित राज्य म्हणून प्रथम क्रमांकावर आहे.25 ते 30 लाख पर्यंत प्रकल्पग्रस्तांची संख्या राज्यात झाली असून प्रत्येक विधानसभेत किमान पाच ते सहा हजारांपर्यंत संख्या प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची संख्या ही राज्यात चार लाखाच्या वर्त झाली आहे अजून पर्यंत प्रकल्पग्रस्त हे आपल्या समस्यांपासून वंचित आहेत.