सडक अर्जुनी: पिपरी रोड बेरडी येथील शेतात इसमाचा मृत्यू; पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे मर्ग दाखल
फिर्यादीचे वडील मृतक सुरजलाल शहारे वय जवळपास ६२ वर्ष रा. सौंदड हे शेतात गेले असता दिवस भर शेतातुन परत न आल्याने फिर्यादी सायंकाळी आपल्या मामा व शेजाऱ्यांना घेउन स्वताःचे शेतात वडीलांना शोधण्यासाठी गेला असता शेतातील धुऱ्याजवळ बांधीत मृतक डोक्याच्या भारावर मृत अवस्थेत पडलेले दिसले. मृतक हे शेतात गेले असता धुऱ्यावरुन घसरुन डोक्याच्या भाराने पडल्याने त्याचा मृत्य झाला असावा असे फिर्यादी विशाल शहारे यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे.