बागलाण: नाशिक ग्रामीण पोलीसांची ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान प्रभावी कारवाई
Baglan, Nashik | Oct 12, 2025 नाशिक ग्रामीण पोलीसांची ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान प्रभावी कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली दिनांक ११/१०/२०२५ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास जिल्हयात ऑलआउट ऑपरेशन राबविले गेले. नाकाबंदी ऑलआउट स्किम दरम्यान केलेल्या कारवाईत जिल्हयातील मालाविरुध्दचे गुन्हयातील एकुण ७९ रेकॉर्डवरील गुन्हेगार व हिस्ट्रीशीटर यांना चेक करण्यात येवुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, १०४० वाहने चेक करण्यात आली.