नेवासा: नाताळ सुट्ट्यांमुळे शिंगणापुर भाविकांच्या गर्दीने हाउसफुल
2025 या वर्षाचा शेवटचा शनिवार, नाताळ सणाची सुट्टी व येणारे नवीन वर्षामुळे श्रीक्षेत्र शनिशिंगणापूरात भाविकांच्या गर्दीत वाढ झाली असून शनिशिंगणापूर राहुरी तसेच शनिशिंगणापूर घोडेगाव या रस्त्यावर अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना भाविकांना करावा लागला.देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांसह शिंगणापूर पोलिसांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.