अर्जुनी मोरगाव: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, देवरी शाखेचा उपक्रम; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी CSR निधीतून ५० संगणक संच भेट
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा देवरी यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी(CSR Fund) अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा व मुला-मुलींच्या वसतीगृहांतील विद्यार्थ्यांसाठी ५० संगणक संच भेट देण्यात आले.या उपक्रमाचा उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाची ओळख करून देणे,डिजिटल शिक्षणात प्रावीण्य मिळवून देणे आणि इंटरनेटद्वारे अभ्यासातील शंका स्वयंपूर्णपणे सोडविण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.