कामठी जवळील रनाला परिसरात असलेल्या एका आरा मशीनला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लाकूड हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण परिसर कचाट्यात घेतला.मिळालेल्या माहितीनुसार, रनाला येथील या आरा मशीनमध्ये अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.