ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरी येथील चोरीतील आरोपीस पोलिसांनी केली अटक
ब्रह्मपुरी येथील पेठ वार्डातील धनीराम नकटू मेश्राम व 71 वर्ष यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने तीन ग्राम सोन्याचे दागिने सोबत नोकिया कंपनीचा मोबाईल एकूण 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता तसेच सोहेल नूरखान यांच्या घरातून दोन मोबाईल अंदाजे किंमत 40000 रुपये चोरून नेले होते या दोन्ही तक्रारी वरून ब्रह्मपुरी पोलिसांनी अज्ञात आरोप विरुद्ध गुन्हा दाखल केला व तपास सुरू केला