दिग्रस: आचारसंहिता काळात अनेक ठिकाणी राजकीय बॅनर कायम, तहसिल कार्यालयात राजकीय नेत्यांची फोटोचे बॅनर काढण्यास प्रशासनाला विसर
दिग्रस नगर परिषद निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली असताना, दिग्रस शहरात प्रशासनाकडून तिची अंमलबजावणी केवळ कागदावरच होत असल्याचे स्पष्ट चित्र ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान समोर आले. दिग्रस शहरातील मुख्य रस्ते, चौक, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी अद्यापही राजकीय नेत्यांचे फोटो, शुभेच्छा बॅनर, उद्घाटन आणि लोकार्पणाचे बोर्ड कायम दिसत आहेत. निवडणूक जाहीर होऊनही हे फलक न काढणे म्हणजे प्रशासनाचे उघडपणे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचे मत आहे.