अर्धापूर: अर्धापूर येथे विनापरवाना देसी व विदेशी दारू बाळगल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान लहाण रोडवर अर्धापूर येथे, आरोपी संतोष लोभाजी गोले, वय 38 वर्षे, रा. लहाण ता.अर्धापूर हा विना परवाना बेकायदेशिररीत्या देशी/विदेशी दारू किंमत 6350/- रू.चा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगलेला मिळून आला फिर्यादी पोकों अखील समदानी बेग, ने. पोस्टे अर्धापूर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी संतोष गोले विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों आडे, हे करीत आहेत