दर्यापूर: जयस्तंभ चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी
दर्यापूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भव्य पथसंचलन काढण्यात आले. सरस्वती मंदिर सार्वजनिक वाचनालयातून सुरू झालेल्या या संचलनाने शहरातील मुख्य मार्गांवरून भ्रमण केले. आज दुपारी ४ वाजता जयस्तंभ चौक,बनोसा येथे भाजपा पदाधिकारी सलीम घानिवाले यांनी मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत स्वयंसेवकांचे स्वागत करून पुष्पवृष्टी केली.या वेळी शहरभरात नागरिकांनीही ठिकठिकाणी फुलवृष्टी करत उत्साहाने पथसंचलनाचे स्वागत केले.कार्यक्रमाच्या शेवटी सरस्वती मंदिर येथे शस्त्रपूजन व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.