नागपूर शहर: खरबी चौक येथे गाडीवरून खाली पडल्याने जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
15 सप्टेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार 10 सप्टेंबरला पार्वता डोंगरे या त्यांच्या नातू सिद्धार्थ यांच्यासोबत दुचाकी वर मागे बसून खरबी चौक येथून घरी येत असताना अचानक त्या गाडीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून पुढील तपास पोलीस करीत आहे.