पनवेल: उलवेत पाणीटंचाईविरोधात रहिवाशांचा हंडा मोर्चा
Panvel, Raigad | Mar 29, 2026 उलवे परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ अनंता टॉवर रहिवासी संघाच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने हंडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सकाळी १० वाजता अनंता टॉवर येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा उन्नती सोसायटीजवळील सिडको कार्यालयावर धडकला. यावेळी महिला, पुरुष तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी पाण्याच्या समस्येचे प्रतीक म्हणून रिकामे हंडे व बाटल्या हातात घेतल्या होत्या.