औसा: सोयाबीन बियाण्यांच्या गुणवत्तेसाठी ठोस पावले आ.अभिमन्यू पवाराच्या पुढाकाराने कृषिमंत्री भरणे यांच्यासोबत चर्चा
Ausa, Latur | Oct 29, 2025 औसा : राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी दर्जाहीन सोयाबीन बियाण्यांमुळे भेडसावणाऱ्या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी इंडोसोया डेव्हलपमेंट असोसिएशन च्या शिष्टमंडळासह कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोयाबीन बियाण्यांच्या गुणवत्तेवर नियंत्रण आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य वेळेत दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.