समुद्रपूर: शिवणफळ येथे वृक्ष दिंडी: बीज दान अभियान
चिमुरड्यांनी केले देशी बियाणे दान:गावकऱ्यांनी केला बीज संवर्धनाचा संकल्प
समुद्रपुर:शेतीला लागणाऱ्या निविष्ठात बियाणे हा घटक अत्यंत महत्वपूर्ण आहे. मात्र शेतकरी बियाणाबाबत परवलंबी आहे. त्या दृष्टीने देशी बियाणे संवर्धन आणि उत्पादन करण्यासाठी देशी बीज दान अभियान १३ गावात राबविण्यात येत आहे. शिवणफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशी बीज अभियान व वृक्ष लागवड मोहीम मगन संग्रहालय समिती व वन विभागाच्या वतीने राबविण्यात आली.यावेळी शालेय विद्यार्थी आणि चिमुरड्यांनी बीज पात्रात देशी बीज दान केले.