समुद्रपूर: युवा शेतकऱ्यांची कर्जपायी शेतात गळफास घेऊन आत्महत्या:सावरखेडा येथील घटना
समुद्रपूर:तालुक्यातील सावरखेडा येथील युवा शेतकरी गजानन रामकृष्ण वाट वय ४० वर्ष या शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गजानन वाट याचे कडे अडिच एकर शेती आहे ती पत्नी च्या नावाने असून तो इतर शेती ठेकाबटइ ने करीत होता सदर त्यांचे शेतीवर भारतीय स्टेट बॅंकचे ८० हजार व बचत गटाचे कर्ज असल्याचे बोलले जाते तर शेती मध्ये मोठे नुकसान झाल्याने त्याचे त्याने शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता सुमारास स्वतःचे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली .