समुद्रपूर: आर्वी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मगन संग्रहालयाच्या बिज उत्सवात सहभागी होत केले बिज दान
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील मगन संग्रहालयाच्या वतीने बिज उत्सवात साजरा करण्याचा उपक्रम सुरू केले असून आर्वी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शनिवारी या बीज दान अभियानात सहभागी होत बिज दान केले. शालेय विद्यार्थ्यांनी देशी बियाण्यांचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून घेतले. विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियाण्यांचे प्रदर्शन आणि माहिती प्रस्तुत केली. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतच बीज बँक उभारण्याचा संकल्प केला.