नागपूर शहर: शासकीय वैद्यकीय रुग्णालयात लहान मुलांच्या आयसीयूमध्ये बाथरूम तुंबले, चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ ?
एक वायरल होत असलेल्या व्हिडिओ हाती आलेला आहे.मेडिकल हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या आयसीयू मध्ये, म्हणजेच वॉर्ड क्रमांक २५ मध्ये, बाथरूम तुंबल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बाथरूममधील पाणी संपूर्ण वॉर्डमध्ये पसरत असून, यामुळे आधीच गंभीर अवस्थेत असलेल्या लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून ही समस्या उद्भवली आहे. हॉस्पिटलमधील कर्मचारी तात्काळ हे पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत.