नागपूर शहर: खापरखेडा पोलीस स्टेशन परिसरात दोन दुचाकींची धडक, दोन्ही दुचाकी चालक जखमी
खापरखेडा पोलीस स्टेशन परिसरात दोन दुचाकींची धडक झाली ज्यामध्ये दोन्ही दुचाकी चालक जखमी झाले. जखमींचे नाव खुशाल विश्वकर्मा आणि नितेश शेरपुर असे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीवरून खुशाल दोन महिला मजुरांना घेऊन भानेगाव कडे जात होता. त्याचवेळी नितेश रामटेक च्या दिशेने जात होता. खुशालने पोलीस स्टेशन जवळ रेल्वे स्टेशन रोड कडे त्याची दुचाकी वळवली तेवढ्यातच समोरून येणाऱ्या नितेशने त्याच्या दुचाकीला धडक दिली.