अलिबाग: आरसीएफ प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न; आमदार महेंद्र दळवी यांचा कंपनीला ७ दिवसांचा अल्टिमेटम
Alibag, Raigad | Sep 15, 2025 आरसीएफ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याच्या प्रलंबित प्रश्नावर आमदार महेंद्र दळवी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नासाठी आजपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, जिल्हाधिकारी आणि उद्योगमंत्र्यांच्या विनंतीवरून त्यांनी आजची नियोजित बैठक घेतली, ज्यात कंपनीला सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. आमदार दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे.