मानगाव: अंबर्ले, लोणेरे येथील श्री सोमजाई बहिरी देवस्थानाचा प्राणप्रतिष्ठा व मंदिर उद्घाटन समारंभ
Mangaon, Raigad | Nov 26, 2025 आज बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत अंबर्ले, लोणेरे येथील श्री सोमजाई बहिरी देवस्थानाचा प्राणप्रतिष्ठा व मंदिर उद्घाटन समारंभ हजारो भाविकांच्या उपस्थितीत जयघोषात पार पडला. आपल्या जन्मभूमीचे सांस्कृतिक वारसा जपणे, समृद्ध करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. या मंदिराच्या उद्घाटनाने धार्मिक तसेच सामाजिक बांधिलकीला नवीन प्रेरणा मिळाली आहे. देवस्थानाच्या विकासासाठी आम्ही पुढे देखील कार्यरत राहू. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.