हिंगोली: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त हिंगोली पोलीस बांधव यांच्या वतीने रन फॉर युनायटी मॅरेथॉन स्पर्धा
तरुण - तरुणींनी या मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सर्वांच्या सहभागाने अतिशय उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अतिशय नियोजन बद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धेचे नियोजन केले होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता,पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आमदार तानाजीराव मुटकुळे माजी.आमदार गजानन घुगे पोलीस, पत्रकार बांधव तसेच स्पर्धक बांधव उपस्थित होते.