सातारा: सातार्यात उरमोडी काठावर दोन राजघराण्यांची भेट; संभाजीराजे व कल्पनाराजे यांच्यात मनमोकळा संवाद
Satara, Satara | Nov 28, 2025 सातारा शहरालगत उरमोडी धरण परिसरात गुरुवारी रात्री उशिरा आयोजित भाजपच्या एका नेत्याच्या कौटुंबिक विवाह सोहळ्याला कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थिती लावली. या दरम्यान त्यांनी सातारच्या छत्रपती घराण्याच्या राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांची विशेष भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज असलेल्या सातारा आणि कोल्हापूर येथील राजघराण्यांची ही भेट सर्वांच्या लक्षवेधी ठरली.