सातारा: चार भिंतीवर शहरातील आतिषबाजी पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे वाहतूक ठप्प
Satara, Satara | Oct 22, 2025 सातारा शहरातील चार भिंतीवरून लक्ष्मीपूजनानिमित्त होणारी फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, सातारा शहरासह परिसरातून नागरिक वाहनांनी या ठिकाणी आतिषबाजी पाहण्यासाठी आले होते त्यामुळे, अनेक वाहनधारकांनी रस्त्यावरच वाहन पार्किंग करून आतिषबाजीचा आनंद घेतला, मात्र या ठिकाणी वाहनांना येण्या जाण्यासाठी रस्त्यावर जागा नसल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती, मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत या ठिकाणी सतत वाहतूक ठप्प होत होती.