बीग बाजार परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीसांनी संशयित आरोपीकडून १५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याबाबत गुरूवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.