अकोला: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गांधी चौक सह बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी
Akola, Akola | Oct 18, 2025 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील गांधी चौक, जय हिंद चौक, डाबकी रोड आणि तहसील परिसरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची दिवाळीची खरेदीसाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली. किरकोळ विक्रेत्यांनी हातगाड्या, स्टॉल्स व जमिनीवर दिवाळीच्या विविध वस्तू मांडून दुकाने सजवली होती. माता लक्ष्मीच्या मूर्ती, पूजेची सामग्री, पणत्या, फुलदाण्या यासह मातीची खेळभांडी खरेदी करण्यासाठी लहान मुली आपल्या पालकांसोबत आवर्जून उपस्थित होत्या. या पारंपरिक खेळण्यांना विशेष मागणी होती. 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 10 वाजेपर