उत्तर सोलापूर: बोरामणी व तांदुळवाडीला बस थांबा मिळणार: धनेश आचलारे यांचा परिवहन मंत्र्यांकडे यशस्वी पाठपुरावा...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी व तांदुळवाडी गावांमध्ये एसटी बस थांबा नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत बोरामणी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांनी महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आश्वासन दिले की, आगामी काळात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या एसटी बसांना बोरामणी व तांदुळवाडी गावात थांबा देण्यात येईल.