मोहाडी: आंधळगाव येथे पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यावर धाड, 63 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील एका जुगार अड्ड्यावर आंधळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. दिनांक 28 सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत पोलिसांनी नगदी रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ₹63,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण सात आरोपींना ताब्यात घेतले आहे, जे सर्व आंधळगाव, ता. मोहाडी येथील रहिवासी आहेत.