रामटेक: चोर बाहुली वनपरिक्षेत्रात आढळला दुर्मिळ राजगिधाड
Ramtek, Nagpur | Mar 30, 2026 रामटेक तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चोरबाहुली वनपरिक्षेत्रात अत्यंत दुर्मिळ मानला जाणाऱ्या किंग व्हल्चरचे दर्शन झाल्याने वन्यजीवप्रेमी, पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सोमवार दिनांक 30 मार्चला दुपारी हा दुर्मिळ गिधाड पक्षी आकाशात घिरट्या घालताना दिसून आला. उंच झाडावर विसावल्यानंतर निसर्गचक्रा नुसार जंगली कुत्र्यानी एका चितळाची शिकार केल्यानंतर या राजगिधाडाने त्यावर ताव मारला.