जालना: जालना शहरातील घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 45 हजारांचा ऐवज लंपास; कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Jun 11, 2026 जालना शहरातील शिवनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवार दि. 11 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रल्हाद विश्वनाथ मुपडे रा. शिवनगर, जुना जालना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते जिल्हा व सत्र न्यायालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. ते त्यांच्या कुटुंबासह नांदेड येथे गेले होते. तेव्हा ही चोरी झाली.